१९ फेब्रुवारी शिवजन्मोत्सव सोहळा २०११

Friday, August 31, 2012

मराठा सेवा संघाचा आज वर्धापन दिन..... हार्दिक शिवेच्छा...

मराठा सेवा संघाचा आज वर्धापन दिन..... हार्दिक शिवेच्छा...

Sunday, February 19, 2012

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...

तमाम शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...

जय जिजाऊ..दर वर्षीप्रमाणेच ह्या वर्षीही शिवधर्म सेवा मंडळ..आपल्यासाठी विशेष काहीतरी घेवून येत आहे...ह्या वर्षी जगभरातील शिवजयंतीची इत्यंभूत माहिती देणारा एक मराठी ब्लौग आपल्या सेवेत सादर करत आहोत...



धन्यवाद...जय जिजाऊ..जय शहाजीराजे..जय शिवराय..!!!

Friday, January 13, 2012

शिवधर्माची संपूर्ण संहिता २०१४ मध्ये पूर्ण होणार - आ ह साळुंखे ह्यांची घोषणा

शिवधर्माची संपूर्ण संहिता २०१४ मध्ये पूर्ण होणार - आ ह साळुंखे ह्यांची घोषणा

बातमी वाचण्यासाठी डबल क्लिक करा..



Blog प्रकाशक- शिवधर्म सेवा मंडळ

जिजाऊ जन्मोत्सव - १२ जानेवारी २०१२

आज मातृतीर्थावर जिजाऊ जन्मोत्सव; देश-विदेशातून जिजाऊ भक्तांचे लोंढे

१२ जानेवारी २०१२ ,प्रतिनिधी , बुलढाणा
यंदाही येथील जिजाऊ सृष्टी प्रकल्पावर मराठा सेवा संघाच्यावतीने सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव सोहळ्याची सांगता मॉं साहेबाच्या ४१४ व्या जन्मोत्सव सोहळ्याने मोठय़ा थाटामाटात होणार आहे. यासाठी मातृतीर्थ नगरी व जिजाऊ सृष्टी नववधुप्रमाणे नटली असून जिजाऊ भक्तांचे लोंढेच्या लोंढे संपूर्ण देशासह परदेशातून मातृतीर्थावर दाखल होत आहेत. ३ जानेवारीपासून सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव सुरू झाला होता.
यानिमित्ताने सृष्टीवरील कार्यक्रमाची सर्वतोपरी तयारी अंतिम टप्यात असून जिजाऊ भक्त मराठा सेवा संघाच्या सर्वच्या सर्व ३१ कक्षाचे श्रेष्ठ-ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते अखंड परिश्रम घेत आहेत. या सोहळ्यासाठी जिजाऊ सृष्टीच्या सुमारे १०० एकराच्या प्रदीर्घ मैदानावर भव्य सभामंडप, स्वागतकक्ष, रोशणाई, स्वागत कमानी, नियंत्रण कक्ष, देणगी कक्ष, स्टॉल नोंदणी कक्ष, चौकशी कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहन पार्किंग व्यवस्था, खान-पान व पुस्तकांचे स्टॉल आदी व्यवस्था सज्ज करण्यात आल्या आहेत.
जिजाऊ सृष्टी परिसराला व जिजाऊ नगरीला या निमित्ताने यात्रेचे स्वरूप आले असून जिजाऊ जन्मस्थळ, राजे लखोजीराव जाधव समाधी स्थळ, राजवाडा रंगमहल यासह संपूर्ण सृष्टीवर भव्य प्रमाणात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
पॅरामोटारमधून पुष्पवृष्टी
दरवर्षीप्रमाणे यंदाही सृष्टीवर व जिजाऊ भक्तांवर पॅरामोटारमधून पायलट भगवानराव जाधव पुष्पवृष्टी करणार आहेत. १२ जानेवारीला सकाळी ६ वाजता राजवाडय़ातील जिजाऊ जन्मस्थळावर विविध मान्यवर जोडप्यांच्या हस्ते जिजाऊंचे पूजन, त्यानंतर सकाळी ८ ते दुपारी २ दरम्यान जिजाऊ सृष्टीवर विविध वैचारिक, भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून ते ज्येष्ठ विचारवंत मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ आधारवड डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगणार आहे. त्यानंतर दुपारी २ ते उत्तररात्रीपर्यंत शिवधर्मपीठावर सेवा संघाच्या ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा संपन्न होणार आहे.
जिजाऊ पुरस्कार
यावेळी याच विचारपीठांवर ‘वीर शिवाजी’ कलर चॅनल्सवरील लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्या शिवमती रूपाली अभिमन्युसिंह यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. आ.ह. साळुखे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार शिवमती रेखाताई खेडेकर, नेताजीराव गोरे, देवानंद कापसे, चंद्रशेखर शिखरेंसह सेवा संघाच्या ३१ कक्षाचे राज्याध्यक्ष व ज्येष्ठ पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यासाठी गेल्या महिनाभरापासून जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष डॉ. दिलीपराव देशमुख, डॉ. अरविंद गावंडे, शिवाजीराजे जाधव, चंद्रशेखर शिखरे, सुभाषराव कोल्हे, तहसीलदार सुनील शेळके, राजेंद्र अढाव, अण्णासाहेब बुरकुल, समाधान शिंदे, कृष्णा कुहिरे, गिरीश वाघमारे, संजय विखे, किशोर खेडेकर, संजय उनगे, राममूर्ती वालसिंगे, उमेश इंगळे, शिवाजी गव्हाड, दाळु पाटील आदी जिजाऊ भक्त परिश्रम घेत आहेत.

आज जिजाऊ जन्मोत्सव, सिंदखेडराजा सज्ज !!!

सिंदखेडराजा, ११ जानेवारी/ वार्ताहर
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव मराठा सेवा संघाच्यावतीने जिजाऊ दशरात्रौत्सव साजरा होत आहे. ३ जानेवारीपासून या सोहोळ्याला सुरुवात झाली असून उद्या १२ जानेवारीला सांगता होणार आहे.
महाराष्ट्रासह देश-विदेशातील पाहुणे मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत पोहोचत आहेत. विविध वैचारिक तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सिंदखेडराजा-जालना मार्गावरील जिजाऊसृष्टी परिसर सज्ज झाला आहे. सुमारे १०० एकराच्या परिसरात भव्य सभामंडप उभारून त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, राजवाडा परिसरात रंगरंगोटी करण्यात आली आहे. रस्त्यावर स्वागत कमानी उभारून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले जात आहे. शिवभक्तांना वैचारिक खाद्य पुरवण्यासाठी पुस्तकांची दुकाने, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच उपाहार गृहाची दुकाने घातली आहे. येणाऱ्या पाहुण्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चौकशी कक्ष, देणगीदारांसाठी देणगी कक्ष उभारण्यात आले आहेत. यामुळे या परिसराला भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिजाऊ जन्मस्थळ, राजे लखोजीराव जाधवांचे समाधीस्थळ, रंगमहाल यासह जिजाऊसृष्टीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे या सोहोळ्यावर पॅराग्लायडिंगद्वारे पुष्पवृत्ती केली जाणार आहे.
उद्या १२ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता राजवाडय़ावरील जिजाऊ जन्मस्थळावर मातोश्री जिजाऊंचे पूजन मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार रेखा खेडेकर, नेताजी गोरे, तहसीलदार सुनील शेळके, काँग्रेस नेत्या जयश्री शेळके, विचारवंत डॉ. आ.ह. साळुंके, देवानंद कापसे, राजे शिवाजीराव जाधव, अरविंद गावंडे, पंढरपूरचे बद्रीनाथ महाराज, चनखोरे, कैकाडी महाराज, ‘शंभुराजे’ नाटक फेम सातारा येथील हर्षवर्धन कदम, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या निमित्ताने या ठिकाणी दिवसभर सांस्कृतिक, वैचारिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. तसेच, मुख्य कार्यक्रमात मराठा विश्व भूषण, जिजाऊ पुरस्काराचे वितरण तसेच, दुपारी २ वाजता शिवधर्मपीठावर नामावंत व्यक्तींचा सत्कार, पुस्तकांचे प्रकाशन व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Friday, February 18, 2011

३८१ व्या शिवजयंतीच्या हार्दिक शिवेच्छा..

शिवजयंती निम्मित प्रकाशित करतोय..सुप्रसीद्ध चित्रकार मिलिंद विचारे ह्यांच्या कुंचल्यातून साकारलेली शिवचरित्रचित्रे ...संकल्पना- प्रतीइतिहासकार चंद्रशेखर शिखरे,प्रकाशक - शिवधर्म सेवा मंडळ.

रायगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज


शिवराज्याभिषेक मिरवणूक



भोसलेभूमी वेरूळ शिव-शिवदर्शन.. वेरूळची लेणी पाहताना शिवाजी महाराज...

लाख मेले तरी चालतील,पोशिंदा मात्र जगला पाहिजे..आधुनिक बळीराजा- शिवराय


रयतेवर जिवापाड प्रेम करणारा राजा
श्रीमंत कोकाटे
Saturday, February 19, 2011 AT 01:00 AM (IST)

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लिहिलेल्या पत्रांमधून त्यांची संवेदनशीलता, प्रेम, शिस्त असे अनेक गुण दिसतात. त्याविषयी शिवजयंतीनिमित्त (ता. १९) एक दृष्टिक्षेप.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या निर्दालनासाठी हाती तलवार घेतली. हा लढायांचा इतिहास तर आपणा सर्वांना ज्ञात आहेच. ढाल-तलवारीच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजीराजांनी रयतेबद्दल व्यक्त केलेल्या भावना, प्रजेच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी घेतलेले निर्णय, काळजी, कळवळा त्यांच्या पत्राद्वारे आपणास प्रकर्षाने जाणवते. छत्रपती शिवाजीराजांनी रयतेवर केलेले जिवापाड प्रेम त्यांच्या विविध पत्रांवरून आपणास समजते.

२३ ऑक्‍टोबर १६६२ रोजी शिवाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना एक पत्र लिहिलेले आहे. शाहिस्तेखानाचे संकट स्वराज्यावर येत आहे. त्याप्रसंगी रयतेची कशाप्रकारे काळजी घ्यावी, हे महाराजांनी सांगितलेले आहे. ""मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीस येताती म्हणौन जासुदानी समाचार आणिला आहे. तरी तुम्हास रोखा अहडताच तुम्ही तमाम आपलेतपियात गावचा गाव ताकिदी करून माणसे, लेकरेबाळे समतर तमाम रयेति लोकास घाटाखाले बाका जागा असेल तेथे पाठविणे. ये कामात हैगै न करणे ..... गावचा गाव हिंडोनु रातीचा दिवस करून लोकाची माणसे घाटाखाली जागा असेल तेथे पाठवणे. या कामास एक घडीचा दिरंग न करणे.'' रयतेच्या रक्षणासाठी एक क्षणाचाही विलंब करू नका, अशा सूचना शिवरायांनी प्रस्तुत पत्रात सर्जेराव जेधे यांना दिलेल्या आहेत.

१९ मे १६७३ रोजी शिवाजी महाराजांनी चिपळूण येथील आपल्या जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना एक पत्र लिहिलेले आहे. यातून शिवरायांना शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा होता, हे स्पष्टपणे लक्षात येते. लष्कराची छावणी चिपळूण येथे पडलेली असताना आपल्या अधिकाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी, याबाबत लिहिलेल्या पत्रातील काही भाग "".......... पागेस अधिक बैठी पडली; परंतु जरूर जालें त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास, तुम्ही मनास ऐसा दाणा, रातीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंढी करून चाराल.

नाहीसें जालें म्हणजे मग काही पडल्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मरायास लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व विलायतीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील कोण्ही कुणब्याचे थील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत, तेहि जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल, की मोगल मुलकांत आले त्याहुनहि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल! ....... रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही. ........ कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही. ........ हाली उनाळ्याला आहे ........ कोण्ही आगट्या करितील, कोण्ही भलतेच जागा चुली, रंधनाळा करितील .......... आगट्या जाळीता, अगर रात्रीस दिवा घरांत असेल, अविस्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. ........'' शिवरायांचे हे पत्र मुळातूनच वाचण्यासारखे आहे. लष्करातील लोकांनी काटकसरीने वागावे. स्थानिक रयतेला त्रास देऊ नये.
शेतकऱ्यांच्या काडीलादेखील हात लावू नये; अन्यथा रयत म्हणेल की मोगलापेक्षा तुम्ही वाईट आहात. आगीपासून धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिलेल्या आहेत. यातून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो.

शिवरायांनी शेतकरी कष्टकरी, श्रमकरी वर्गाचे हित जोपासले. आपल्या सैनिकांवर सहकाऱ्यांवर जिवापाड प्रेम केले. २ सप्टेंबर १६६० रोजी शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांना एक पत्र लिहिलेले आहे. कान्होजी जेधे आजारी असल्याची माहिती मिळाल्यामुळे महाराज त्यांना लिहितात, ""औसध घेऊन शरीरासी आरोग्य होई ते करणे. उपचाराचे विशी आलस न करणे... औषधोपचार घेऊन बरे होणे. त्याबाबत हयगय करू नये,'' असा अत्यंत मायेचा सल्ला शिवरायांनी कान्होजी जेधेंना दिलेला आहे.

शिवाजी महाराजांची अनेक पत्रं आहेत. त्यातून शिवरायांची संवेदनशीलता, प्रेमळपणा, वक्तशीरपणा, शिस्त, व्यवस्थापन, धर्मनिरपेक्षता, नैतिकता, प्रशासनव्यवस्था याची माहिती मिळते. शिवाजी महाराजांच्या पत्रावरून लक्षात येते की, शिवरायांचे स्वराज्य हे रयतेचे लोककल्याणकारी राज्य होते. Thanks-e-sakal.com






Wednesday, February 9, 2011

Monday, February 7, 2011

स्वराज्यसंकल्पक शाहजीराजे भोसले आणि स्वराज्यप्रेरणा जिजाऊसाहेब




Swarajyaprerana Rashtramata Jijausaheb & Swarajyasankalpak Rashtrapita Shahjiraje Bhosale...


We are thankful to Artist Mr.Milind Shimpi, Mr.Milind Wichare (jijau,shahjiraje paintings resp.) Also..Famous Novelist Mr.Madan Patil,Historian Chandrashekhar Shikhre

- Shivdharam Seva Mandal

Sunday, February 6, 2011